शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर महापालिकेत बनावट नियुक्ती आदेश प्रकरण; पोलिसांकडून 'मास्टरमाईंड'चा शोध सुरू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:10 IST

माहिती अधिकारात विचारणा केल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

लातूर : लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर करून तब्बल सहा जणांना 'लिपिक' पदाचे खोटे नियुक्ती आदेश देण्यात आल्याची धक्कादायक माहिती, माहिती अधिकार कायद्यातून उघडकीस आल्यानंतर बनावट आदेश देणारा सूत्रधार कोण याचा तपास शिवाजीनगर पोलिसांनी सुरू केला आहे.

शुभम बाळासाहेब गरड, ज्ञानेश्वरी रवी गरड, मारुती भगवान शिवणे, आदित्य बंकट भिंगे, सोमनाथ लक्ष्मण पांचाळ आणि बापूराव कोंडीराम हुडे या सहा अर्जदारांनी स्वतःला मिळालेले 'लिपिक' पदाचे नियुक्ती आदेश अधिकृत आहेत की नाहीत, याबाबत माहिती अधिकारात विचारणा केली होती. यावर महापालिकेने शहानिशा केली असता, हे सर्व आदेश पूर्णपणे बनावट असून, ते मनपा प्रशासनाकडून कधीही जारी झालेले नाहीत, असे स्पष्ट केले आहे. या गैरप्रकारात महापालिकेतील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग नसल्याचेही मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता ३ डिसेंबर रोजीच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

तपासासाठी मूळ कागदपत्रांची मागणीशिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या तक्रारीसोबत पोलिसांना सध्या केवळ बनावट नियुक्ती आदेशाची छायांकित प्रत मिळाली आहे. मूळ कागदपत्रे पोलिसांना अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. मूळ कागदपत्र तपासासाठी महत्त्वाची आहेत. मूळ कागदपत्र प्राप्त होताच गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Appointment Scam Rocks Latur Municipal Corporation; Mastermind Hunt On!

Web Summary : Latur police investigate a fake appointment scam involving forged documents. Six individuals received bogus clerk appointment letters using forged signatures. Police seek original documents to file a case and unmask the mastermind behind the fraud.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर