डेंग्यूची साथ रोखण्यात मनपाला अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:39+5:302021-08-24T04:24:39+5:30
लातूर महानरगपालिकेने पावसाळ्यापूर्वीच गटारी साफ करण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे होते. परंतु याकडे मनपाने लक्ष दिलेले नाही. गटारी साफ ...

डेंग्यूची साथ रोखण्यात मनपाला अपयश
लातूर महानरगपालिकेने पावसाळ्यापूर्वीच गटारी साफ करण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे होते. परंतु याकडे मनपाने लक्ष दिलेले नाही. गटारी साफ करण्याची मोहीम राबविण्याऐवजी कागदोपत्री चालविली. त्यामुळे लातूरकरांना डेंग्यूसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक वाॅर्डामध्ये पाहिले तर तुंबलेल्या गटारी दिसून येतील. सध्या महापालिकेच्या माध्यमातून कंटेनर सर्व्हे झालेला आहे. सध्याच्या काळामध्ये आठ दिवसाला पाणी सोडले जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचा साठा असणे स्वाभाविक आहे. बऱ्याच दिवसांचा असलेला पाण्याचा साठा डेंग्यूसाठी पूरक आहे. ते माहीत असतानाही मनपाकडून ॲबेटिंगची फवारणी केली जात नाही. मनपाने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याच्या वतीने अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केली आहे.