शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई नोंदणीसाठी ४ जूनपर्यंत मुदतवाढ; लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ६८०५ विद्यार्थ्यांचे अर्ज

By संदीप शिंदे | Updated: May 31, 2024 19:14 IST

२१५ शाळांची शिक्षण विभागाकडे नोंदणी : राज्यस्तरावर निघणार सोडत

लातूर : आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, जुन्याच पद्धतीने प्रवेशप्रक्रिया होत आहे. दि. ३१ मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत १८६५ जागांसाठी ६८०५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता अर्ज करण्यास ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेशप्रक्रियेत नवीन नियमानुसार जिल्हा परिषद, मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश करण्यात आला होता. त्यात इंग्रजी शाळांचा पर्याय येत नव्हता. विशेष म्हणजे नवीन नियमानुसार १७००हून अधिक शाळांनी नोंदणी केली होती. यात २२ हजार जागा भरल्या जाणार होत्या. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. केवळ १२०० अर्ज या प्रक्रियेसाठी दाखल झाले होते. त्यातच शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी १७ मेपासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. दि. ३१ मेपर्यंत पालकांना आपल्या पाल्याचे अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यात आता ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६ हजार ८०५ अर्ज आले असून, यामध्ये १४८६ अर्ज कन्फर्म झालेले नाहीत. तसेच ५३१९ अर्ज स्विकारण्यात आले आहेत. दरम्यान, आता राज्यस्तरावरुन सोडत निघणार असून त्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. 

शाळा सुरु होण्यापुर्वीच सोडत जाहीर होणार...२०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत शाळा १५ जुनपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे निर्धारित वेळेत आरटीईची प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. ३१ मे रोजी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अशी शक्यता होती. मात्र आता ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता त्यानंतरच अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. पुण्यावरुन राज्यस्तरीय सोडत काढण्यात येईल. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांस संदेश येणार असून, समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर  प्रवेश निश्चित करावे लागणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरRight To Educationशिक्षण हक्क कायदा