महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:00 IST2021-01-08T05:00:34+5:302021-01-08T05:00:34+5:30
सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वैयक्तिक लाभार्थी ...

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास मुदतवाढ
सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वैयक्तिक लाभार्थी म्हणून नाेंदणी करू इच्छिणारे शेतकरी आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करू शकतात. ज्या अर्जदाराकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नाेंदणी करावी, सदरील नोंदणी क्रमांक माहडीबीटी पाेर्टलमध्ये नमूद करून योजनांसाठी अर्ज करावा. तसेच अनुदान वितरित करण्यापूर्वी आधार क्रमांक पोर्टलवर प्रमाणित करणे गरजेचे आहे. अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन लॉटरी, पूर्व संमती, तपासणी आदी प्रक्रिया राबविली जाणार आहे. ११ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पाेर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.