‘मुद्रांक शुल्क व नोंदणीमध्ये मुदतवाढ द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:16+5:302020-12-15T04:36:16+5:30
प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार लातूर - अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा सत्कार करण्यात ...

‘मुद्रांक शुल्क व नोंदणीमध्ये मुदतवाढ द्या’
प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार
लातूर - अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बालकुंदे, जिल्हाध्यक्ष सुनीलकुमार हाके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पोद्दार, विजयकुमार सातपुते, संतोष भोसले, सुनील बिराजदार, प्रतीक बालकुंदे, श्रीपाद पाटील, स्वराजदत्त हाके आदींची उपस्थिती होती.
ऑनलाईन राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस साजरा
लातूर - महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, रोटरी क्लब लातूर मिडटाऊन यांच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास डी.व्ही. कुलकर्णी, केदार खमितकर, संतोष कुलकर्णी, प्रवीण झा, बळवंत रणदिवे यांची उपस्थिती होती.
दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सत्काराचे आयोजन
लातूर - दयानंद शिक्षण संस्था व लातूर जिल्हा बहुविध क्रीडा संघटनेच्या वतीने महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीकांत व नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा सत्कार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. उपस्थितीचे आवाहन संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, ललितभाई शहा, अरविंदराव सोनवणे, रमेशकुमार राठी, रमेश बियाणी, सुरेश जैन, संजय बोरा, रामराव पाटील, ॲड.श्रीकांत उटगे, ॲड.बळवंत जाधव, ॲड. आशिष बाजपाई यांनी केले आहे.