प्रत्येकाने वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:44+5:302021-08-14T04:24:44+5:30
येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती, आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि बी.ए., बी.कॉम ...

प्रत्येकाने वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे
येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती, आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि बी.ए., बी.कॉम तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संग्राम मोरे होते. यावेळी प्रा. डॉ. डी.पी. कांबळे, प्रा. डॉ. सुरेश कातळे, प्रा. डॉ. नंदकुमार माने, प्रा. डॉ. दैवशाला नागदे, डॉ. संजय मोरे, जी. आर. सरवदे, डॉ. अनिलकुमार राठोड, प्रा. डॉ. प्रशांत चव्हाण, प्रा. डॉ. देवीदास भोयर, प्रा. डॉ. पांडुरंग मगर, सतीश शेळके, संजय बेगडे, प्रशांत शिंदे, गौतम गायकवाड, नितीन कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. पवार म्हणाले, विविध क्षेत्रातील परिपूर्ण माहिती, ज्ञान हे आपल्याला पुस्तकातून मिळते. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तक वाचन केले पाहिजे. ज्ञानाशिवाय माणूस अपूर्ण आहे. यावेळी प्राचार्य डॉ. संग्राम मोरे, ग्रंथपाल डॉ. विक्रम गिरी यांनी मनाेगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विनोद नारंगवाडे यांनी केले. आभार रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. अशोक गायकवाड यांनी मानले.