शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातही देवर्जन सोसायटीची शंभर टक्के वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST

उदगीर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली देवर्जन येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची कर्ज वसुली २०व्या वर्षीही १०० ...

उदगीर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली देवर्जन येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची कर्ज वसुली २०व्या वर्षीही १०० टक्‍के झाली आहे. एकविसाव्या वर्षी ही संस्था पुन्हा कर्जवसुलीत जिल्ह्यात प्रथम आणण्याचा विडा संचालक मंडळाने उचलला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे दिले जाणारे सन्मान व पुरस्कार दरवर्षी पटकावणारी ही एकमेव संस्था आहे.

देवर्जन मध्यम प्रकल्पामुळे परिसरातील ग्रीन बेल्टला कर्जपुरवठा करणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे. सहकारी कायद्यानुसार नियम, अटी आणि ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या तत्वावर चालणारी ही संस्था आहे. सध्याची कर्जदार सभासद संख्या १,२५० असून, ५ कोटी ४२ लाखांचा कर्जपुरवठा केलेला होता. त्यांची सर्व कर्जदार सभासद शेतकऱ्यांनी वेळेवर उचल आणि वेळेवर कर्जाची परतफेड करत जूनमध्ये उचल रकमेचा ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरणा करून, विसाव्या वर्षीही १०० टक्‍के कर्ज वसुलीत संस्था प्रथम आली आहे. देवर्जन सोसायटी दरवर्षी शेतकरी, कर्जदार सभासद, बिगर कर्जदार सभासदांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून सतत अग्रेसर राहते. यावर्षी कोरोना महामारीच्या काळात संस्थेच्या सर्व सभासदांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. यासाठी संस्थेचे गटसचिव राम मोतीराम बिरादार, जनरल मॅनेजर टी. एम. जाधव, वसुली अधिकारी व्ही. जी. शिंदे, व्यवस्थापक राजेश मुळे, क्षेत्रीय अधिकारी हणमंतराव पवार, शाखा तपासणीस आर. जे. पुरी, शाखा व्यवस्थापक विनोद लोखंडे, शंकर पात्रे, संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश खटके, अध्यक्ष सूर्यकांत रोडगे, उपाध्यक्ष गंगाधर कोपले, गटसचिव राम बिरादार, सोसायटीचे संचालक बालाजी बिरादार, अंतेश्वर रोडगे, मन्मथ रोडगे, गोपाळ येलमटे, दयानंद रोडगे, रमेश जाधव, संचालिका दैवशाला वाडीकर, शांताबाई सलगरे, लिपिक सुरेश खटके यांनी परिश्रम घेतले.