शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महाविद्यालयात मूल्यांकन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एल. व्ही. पिंपळपल्ले यांनी केले तर सादरीकरण डॉ. जी. डी. रेडे ...

या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एल. व्ही. पिंपळपल्ले यांनी केले तर सादरीकरण डॉ. जी. डी. रेडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांनी मूल्यांकनासंदर्भात सखोल माहिती दिली तसेच संस्थेचे सचिव गंगाधरराव दापकेकर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मूल्यांकनासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. सचिन मुळे यांनी आभार मानले.

मुख्याधिकारी भारत राठोड यांचा सत्कार

उदगीर : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी उदगीर शहरात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने केंद्रप्रमुख महानंदा बहेनजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी राठोड यांनी उदगीर शहरात स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा अभियान यासह कोरोना काळात पुढाकार घेऊन उदगीर शहराला नामांकन प्राप्त करून दिले आहे. त्यांनी शहरात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राम मोतीपवळे, रश्मी बहेनजी उपस्थित होत्या.

सुनेगाव शेंद्री येथे शिवराज्याभिषेक दिन

अहमदपूर : तालुक्यातील सुनेगाव शेंद्री ग्रामपंचायतीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच उषा जायभाये, सदस्य आरती बेले, गोपीनाथ जायभाये, राम जायभाये, माजी सरपंच सोपान जायभाये, ग्रामसेवक बिरादार, गोविंद काळे, गोपाळ काळे, सगरबाई जायभाये, श्रीकांत केंद्रे, बाळू काळे, अशोक जायभाये, सखाराम जायभाये, बालाजी वाघमारे, नारायण जायभाये, राजू थगनर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जलसंपदा शासकीय वसाहतीत वृक्ष लागवड

लातूर : पर्यावरण सप्ताहानिमित्त मंगळवारी पाटबंधारे उपविभाग क्रमांक ३ व वृक्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणातून सुशोभिकरण मोहिमेची सुरुवात शासकीय पाटबंधारे तेरणा वसाहत, जुना औसा रोड, लातूर येथे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे व कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी अभियंता एस. जी. कोन्गे, नितीन पाटील, वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप, एस. पी. जावळी, एस. वाय. वाघमारे, अभिजीत नितनवरे, भीमाशंकर हुलसुरे, गोरख जाधव, चांद शेख, आर. के. पाटील, संभाजी मोरे, स्वामी, पृथ्वीराज पवार उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडून खते, बियाण्यांची जुळवाजुळव

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांकडून बियाणे, खतांचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात तूर, सोयाबीन, आदी पिकांना सर्वाधिक पसंती असते. दरम्यान, यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज सांगितला असल्याने शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान, कृषी सेवा केंद्रावर बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांनी जमीन चांगली ओली होईपर्यंत पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रवासी निवारा उभारण्याची मागणी

लातूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने अनलॉक करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत झाली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करत एस. टी. सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, पावसाचे दिवस असल्याने एस. टी. प्रवाशांसाठी प्रवासी निवारा शेड आवश्यक आहे. दरम्यान, अनेक गावांमधील ग्रामस्थांनी बसथांब्याच्या ठिकाणी प्रवासी निवारा शेड उभारण्याची मागणी केली आहे. याकडे एस. टी. महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जेवळी रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी

लातूर : तालुक्यातील जेवळी, साई, हरंगूळ खु. आदी गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.