शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पोस्ट कोविड संशोधन केंद्र स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:12+5:302021-06-03T04:15:12+5:30
पोस्ट कोविड ओ.पी.डी. दररोज सकाळी ९ ते १ या कालावधीमध्ये बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीमध्ये चालू राहील. पोस्ट कोविड रुग्णांना सुटी ...

शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पोस्ट कोविड संशोधन केंद्र स्थापन
पोस्ट कोविड ओ.पी.डी. दररोज सकाळी ९ ते १ या कालावधीमध्ये बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीमध्ये चालू राहील. पोस्ट कोविड रुग्णांना सुटी मिळाल्यानंतर सातव्या व चौदाव्या दिवशी या ओ.पी.डी.मध्ये फेरतपासणी करण्यात येईल. त्यावेळी फुप्फुसाची तपासणी स्पायरोमेट्रीद्वारे योग्य रुग्णांची मोफत तपासणी करुन उपचाराबाबत सल्ला देण्यात येईल. याद्वारे पोस्ट कोविड फायब्रॉसिस व फुप्फुसाची क्षमता तपासणीसाठी मदत होईल. यासोबतच गरज असलेल्या रुग्णांची टु.डी. ईको, कार्डिओग्राफी, सी. टी. स्कॅन तपासणी मोफत करण्यात येईल. या पोस्ट कोविड बाह्यरुग्ण विभागाचे प्रभारी म्हणून श्वसनविकारतज्ज्ञ तथा सहायक प्राध्यापक क्षयरोग विभाग डॉ. अभिजित यादव हे कामकाज पाहतील.
पोस्ट कोविड संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष डोपे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव बनसुडे यांनी समन्वयक म्हणून कामकाज पाहिले. यावेळी औषध वैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. नीलिमा देशपांडे, बालरोग विभागप्रमुख डॉ. शिवप्रसाद मुंदडा, डॉ. चंद्रकांत रायभोगे, डॉ. गजानन हलकंचे, डॉ. मेघराज चावडा, डॉ. सदानंद कांबळे, डॉ. आशिष चेपुरे, डॉ. गवळी व इतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.