उदगीरात मुस्लिम सोशल वेल्फेअर असो.ची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:41+5:302021-08-14T04:24:41+5:30
प्रारंभी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजाच्या विविध सामाजिक समस्या व सामाजिक प्रश्न तसेच मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण ...

उदगीरात मुस्लिम सोशल वेल्फेअर असो.ची स्थापना
प्रारंभी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजाच्या विविध सामाजिक समस्या व सामाजिक प्रश्न तसेच मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते मुस्लिम सोशल वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करण्यात आली.
अध्यक्षपदी शहाजहान इस्माईल शेख यांची निवड करण्यात आली. बैठकीस समाजाचे ज्येष्ठ नेते बाहोद्दीन जलकोटे, अरिफभाई हाश्मी, ऑल इंडिया ह्युमन राईट्स उदगीरचे अध्यक्ष हाफेझ शेख सद्दामभाई, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शन्नाभाई पटवेघर, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहराध्यक्ष अरिफभाई मिर्दे, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांकचे तालुकाध्यक्ष अझरभाई मोमीन, रेहबर एज्युकेशन ग्रुपचे अल्ताफभाई चाऊस, रोटी कपडा बँकेचे अध्यक्ष असद जमाल सिद्दीकी, शेख रफियोद्दीन (पेंटर), खय्युम पटेल नेत्रगावकर, सुराज्य संघटनेचे अध्यक्ष शहाजहान इस्माईल शेख, जमियत उलेमा ए हिंदचे मौलाना अब्दुल अझीझ राजा पटेल, हक्कानी खाजाखाँ पठाण, शेख चांदभाई आदी उपस्थित होते.