बेघर, बेवारस, मनोरूग्णांसाठी निवारा केंद्र उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:18+5:302021-07-30T04:21:18+5:30
लातूर : लातूर शहरातील बेघर, बेवारस आणि मनोरुग्णांसाठी महानगरपालिकेकडून निवारा केंद्र बांधण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ...

बेघर, बेवारस, मनोरूग्णांसाठी निवारा केंद्र उभारावे
लातूर : लातूर शहरातील बेघर, बेवारस आणि मनोरुग्णांसाठी महानगरपालिकेकडून निवारा केंद्र बांधण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. युवकचे शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्याशी चर्चा केली. लातूर शहरात सध्या बेवारस व मनोरुग्ण रुग्णांची संख्या वाढली आहे, याचा गैरफायदा काही लोकांनी घेतला असून, दोन महिला गरोदर राहिल्या आहेत आणि पुरुषांमध्ये गँगरीन इन्फेक्शनचे प्रमाण वाढले असल्याचे शिष्टमंडळाने आयुक्तांना सांगितले. दरम्यान, निवारा केंद्राचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असेही निवदेनात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख, प्रदेश सचिव गजानन खमितकर यांनी आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी आकाश गायकवाड, जहांगीर शेख, अभिजित सगरे, रंजीत पवार, इरफान बागवान, एहरार हक्कानी, आकाश सर्जे रायवाडीकर, सुदर्शन बिराजदार, विकास जाधव, परवेझ सय्यद, शाम पवार, शुभम जाधव, बाबा मोमीन, बबलू तोडकर, विकास दादा लांडगे, अनिल विरेकर, डॉ. ललित तलवारे, रवी वाघमारे, तोसिफ शेख, सिध्दार्थ सूर्यवंशी, श्रीपाद पाटील, सागर खुब्बा, शाम सावळे, संभाजी लातूरे, मिन्हाज शेख, सलमान पठाण आदी उपस्थित होते.