एळकोट- एळकोट जय मल्हारचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST2021-02-07T04:18:37+5:302021-02-07T04:18:37+5:30
... पळशीच्या सरपंचपदी वर्षा भंडारे रेणापूर : तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा भंडारे, तर उपसरपंचपदी दशरथ जाधव पाटील यांची ...

एळकोट- एळकोट जय मल्हारचा जयघोष
...
पळशीच्या सरपंचपदी वर्षा भंडारे
रेणापूर : तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा भंडारे, तर उपसरपंचपदी दशरथ जाधव पाटील यांची निवड करण्यात आली.
अध्यासी अधिकारी सचिन नरहारे, ग्रामसेवक रवींद्र पारेकर, तलाठी महेश साळुंके, नरसिंग जाधव यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
पळशीत देवीदासराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्रामविकास पॅनलने वर्चस्व निर्माण केले आहे. यावेळी मीरा जाधव, अंजलीताई जाधव, गंगाधर शिंदे, वंदना पुरी, दीपा उपाडे आदी उपस्थित होते. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्धवराव जाधव, खंडू पवार, दिगंबर जाधव, दगडूसाहेब जाधव, बब्रुवान शिंदे, हणमंत जाधव, चंद्रकांत जाधव, मनोज जाधव, परमेश्वर जाधव, दत्ता भोसले, गुणवंत भंडारे, केशव गिरी, सिद्धेश्वर जाधव, केशव पांचाळ, बाळासाहेब जाधव, विठ्ठल भारती, श्रीनिवास जाधव, मोतीराम जाधव, पांडुरंग जाधव, हणमंत जाधव, राजाभाऊ जाधव, पवन जाधव, धनेश्वर शिंदे, काका शिंदे, धर्मराज गव्हाणे, सिद्राम जाधव, महेश जाधव, सुदाम जाधव, विश्वनाथ जाधव, बळीराम शिनगारे, उद्धव भंडारे, अमोल जाधव, शरद पवार आदी उपस्थित होते.
...
सुमठाणाच्या सरपंचपदी उत्तमराव बिरादार
डिगोळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उत्तमराव बिरादार, तर उपसरपंच निर्मलाबाई बाबूराव वाडकर यांची निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी एस.बी. आडे यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. यावेळी सदस्य धोंडिराम पौळे, श्रीदेवी मानकेश्वरे, रंजना वाडकर, कमलबाई काळे, कौशल्याबाई गिरी यांची उपस्थिती होती.
...
आंबेगाव ग्रामपंचायतीचा कारभार महिलांकडे
कुमठा बु. : अहमदपूर तालुक्यातील आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सत्यभामा भगवानराव पाटील, तर उपसरपंचपदी वैशाली हिरामण डावळे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भास्कर पाटील, बाळू पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
...