अध्यक्षपदी उर्मिला शिंदे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST2021-02-07T04:18:20+5:302021-02-07T04:18:20+5:30
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप लातूर : येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रमेश ...

अध्यक्षपदी उर्मिला शिंदे यांची निवड
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
लातूर : येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रमेश बिरादार, अशोक पवार, मदन धुमाळ, शोभा कांबळे, सुनीता जवळे, अनुराधा पाटील, संजय गुरमे, अशोक मुंढे, महेश मोटाडे, पांडुरंग कुलकर्णी, सत्यवान देशपांडे, सुधाकर लोहकरे, विवेकानंद लोहकरे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे आदींसह शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
लातूरच्या पूर्व भागात माणुसकीची भिंत
लातूर : येथील स्वामी विवेकानंद चौकात मनपाच्या जागेत शहर पूर्व भाग कृती समितीच्या वतीने माणुसकीच्या भिंतीचे अनावरण करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी, सभापती मंगेश बिराजदार, रघुनाथ मदने, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, बाबासाहेब बनसोडे, ताहेरभाई सौदागर, दिलीप गायकवाड, देवेश धर्माधिकारी, ॲड. आनंद सोनवणे आदींची उपस्थिती होती. यावेळी घंटागाडीवरील कामगारांना टी-शर्ट वितरीत करण्यात आले.
लातूर एमआयडीसी प्रॉपर्टी टॅक्समधून वगळावी
लातूर : नांदेड एमआयडीसीप्रमाणे लातूर एमआयडीसी ही प्रॉपर्टी टॅक्समधून वगळावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केेली आहे. सदरील मागणीसाठी लातूर जिल्हा आजारी उद्योग संघटनेचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत पाटील गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करीत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे लातूर एमआयडीसी प्रॉपर्टी टॅक्स वगळल्यास उद्योगांना आधार मिळेल. याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने करवसुलीसाठी मोहीम
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने करवसुलीसाठी मोहीम राबविली जात असून, नागरिकांकडून कराचा भरणा केला जात आहे. क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, कर निरीक्षक तहेमद शेख, नितीन घोडके, सुहास भिकाणे, प्रवीण चिद्रे, महादेव बेलकुंदे, गाेरोबा कांबळे, अमजद शेख आदींनी तापडिया मार्केट परिसरात मोहीम राबविली. यावेळी अनेकांनी महापालिकेच्या थकीत कराचा भरणा केला. शहरातील नागरिकांनी कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम
लातूर : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, वेगाचे प्रमाण, वाहतुकीचे नियम आदीबाबत जनजागृती केली जात आहे. अनेक महाविद्यालयांनी या अभियानाच्या अनुषंगाने तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या उपक्रमाला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हरंगुळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे गैरसोय
लातूर : तालुक्यातील हरंगुळ नवीन वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अवजड वाहनांची रेलचेल असल्याने किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्याकडे संबधितांचे दुर्लक्ष होत आहे. तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.