देवणी तालुक्यात सहा गावांच्या सरपंच, उपसरपंचांची निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:41+5:302021-02-10T04:19:41+5:30

तळेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सदाशिवराव पाटील तळेगावकर यांची तर उपसरपंचपदी रंजना धनाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कवठाळा ...

Election of Sarpanch and Deputy Sarpanch of six villages in Devani taluka | देवणी तालुक्यात सहा गावांच्या सरपंच, उपसरपंचांची निवडी

देवणी तालुक्यात सहा गावांच्या सरपंच, उपसरपंचांची निवडी

तळेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सदाशिवराव पाटील तळेगावकर यांची तर उपसरपंचपदी रंजना धनाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कवठाळा ग्रामपंचायत सरपंचपदी शंकरराव हुडे तर उपसरपंचपदी मल्लिकार्जुन हुडे यांची निवड करण्यात आली. संगम येथील सरपंचपदी राजाबाई रेवण पाटील तर उपसरपंच म्हणून रमेश निवडगे यांची निवड करण्यात आली आहे. सावरगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सत्यभामा रामचंद्र मसुरे तर उपसरपंचपदी स्वाती पंढरी जोलदापके यांची निवड करण्यात आली. भोपणी येथील सरपंचपदी लक्ष्मण हाणमंतराव डोपावाड तर उपसरपंचपदी चंद्रकला शहाजी बिरादार यांची बहुमताने निवड करण्यात आली. कोनाळी येथील सरपंचपदी दशरथ साधुराम माने तर उपसरपंच म्हणून रामदास मधुकर बिरादार यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्या-त्या गावात ग्रामस्थांच्या वतीने नूतन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Election of Sarpanch and Deputy Sarpanch of six villages in Devani taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.