देवणी तालुक्यातील ११ गावांत सरपंच, उपसरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:28+5:302021-02-15T04:18:28+5:30
पाच गावच्या महिला झाल्या कारभारी देवणी : तालुक्यातील पाच गावच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पाडला. विशेष म्हणजे आज ...

देवणी तालुक्यातील ११ गावांत सरपंच, उपसरपंचांची निवड
पाच गावच्या महिला झाल्या कारभारी
देवणी : तालुक्यातील पाच गावच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पाडला. विशेष म्हणजे आज झालेल्या पाचगावच्या सरपंच या महिलाच झाल्या आहेत तर तीन गावच्या उपसरपंच पदीही महिलाच निवडण्यात आले. बोळेगाव सरपंचपदी रंजना भरत म्हेत्रे तर उपसरपंचपदी आश्विनी राजकुमार पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अंबानगर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कल्पना अनिल रोट्टे तर उपसरपंचपदी ज्ञानोबा विठ्ठल सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. इंद्राळ सरपंचपदी प्रभावती ज्ञानोबा पाटील तर उपसरपंचपदी कमळाबाई विश्वनाथ म्हेत्रे यांची निवड झाली. बटनपुर सरपंचपदी ज्योती तुकाराम कांबळे यांची तर उपसरपंचपदी स्वाती विवेक बिरादार यांची बिनविरोध निवड झाली. तर अनंतवाडी सरपंचपदी चंद्रकला शिवाजी बिरादार तर उपसरपंच बालाजी पुंडलिक बिरादार यांची बहुमताने निवड करण्यात आली.
३३ गावाच्या सरपंच, उपसरपंचाची निवड
देवणी तालुक्यात झालेल्या ३३ ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम संपला. कमालवाडी, आंबेगाव येथील सरपंचपदे रिक्त राहिले तर जवळगा येथे उपसरपंचाची निवड झाली नाही. तालुक्यातील ३१ सरपंच आणि ३२ उपसरपंचाच्या निवडी झाल्या आहेत.