जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:16+5:302021-02-11T04:21:16+5:30

सोनवळा येथे आयोजित सर्वरोगनिदान, रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती नागरगोजे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे ...

Efforts are being made to make Jalkot a hill taluka | जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

सोनवळा येथे आयोजित सर्वरोगनिदान, रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती नागरगोजे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदन पाटील, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सरपंच राहुल सूर्यवंशी, प्रा. व्यंकटराव मुंडे, डॉ. चंदावार, डॉ. रामप्रसाद लखोटिया आदी उपस्थित होते.

शिबिरासाठी डॉ. रामप्रसाद लखोटिया, डॉ. देविदास भोसले, डॉ. विद्यासागर आसुले, संदीप मुसळे, डॉ. पंकज मुंडे, डॉ. महेश धुमाळ, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, भाजपाचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, बाबुराव नागरगोजे, उपअभियंता गर्जे, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. व्यंकटराव मुंडे यांनी केले.

सर्वांना शुध्द पाणीपुरवठा...

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, सर्वांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यातील सर्वांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल. याशिवाय, तालुक्यात शिल्लक राहिलेले रस्ते मग्रारोहयोअंतर्गत पूर्ण करण्यात येतील.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व परिसरातील सर्व गावांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेमधून भरीव निधी देण्यात येईल.

Web Title: Efforts are being made to make Jalkot a hill taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.