तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:01+5:302021-07-30T04:21:01+5:30
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक ...

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा व त्याची अंमलबजावणी या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले, जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सार्वजनिक हिताचे रक्षण करावे. तसेच तंबाखू विक्रेत्यांनी शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री करू नये, तसेच धोक्याची सूचना नसलेले तंबाखूजन्य पदार्थ विकू नयेत. १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रास्ताविक जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा सल्लागार डॉ. माधुरी उटिकर यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची उद्दिष्टे व कार्य याबद्दल माहिती सांगितली. कार्यशाळेस जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक भातलवंडे, जितेंद्र कदम, डॉ. लक्ष्मण देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरीदास यांची उपस्थिती होती.