शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सुरक्षेत वाढ करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST2021-07-14T04:22:49+5:302021-07-14T04:22:49+5:30
लातूर : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. एक आदर्श ...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सुरक्षेत वाढ करावी
लातूर : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. एक आदर्श शिक्षणमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. दोन दिवसांपूर्वी हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे मराठवाडा पालक संघाच्यावतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर पालक संघाचे अध्यक्ष डॉ. भारत घोडके, सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांची नावे आहेत. शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्र्यांकडून होत आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू केली. त्यांची शिक्षण क्षेत्राला गरज आहे. त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी, असेही मराठवाडा पालक संघाचे अध्यक्ष डॉ. भारत घोडके व सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी निवेदनात म्हटले आहे.