टीव्हीसमाेर बसून जेवण करणे घातक, पाेटविकार वाढण्याचा धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST2021-06-17T04:15:06+5:302021-06-17T04:15:06+5:30
मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही, माेबाइल मुलांना जेवायला द्यायचे म्हणजे अगाेदर माेबाइल अथवा टीव्हीवर कार्टून लावून द्यावे लागते़ ...

टीव्हीसमाेर बसून जेवण करणे घातक, पाेटविकार वाढण्याचा धाेका
मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही, माेबाइल
मुलांना जेवायला द्यायचे म्हणजे अगाेदर माेबाइल अथवा टीव्हीवर कार्टून लावून द्यावे लागते़ जाेपर्यंत आवडीचे कार्टून लावले जात नाही, ताेपर्यंत मुले ताेंडात घास घालत नाहीत़ सध्याला मुले खूपच सतावत आहेत़ त्यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी हा हट्ट पुरवावा लागताे़
- माधुरी हिंपळनेरकर
ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांच्या ताब्यात माेबाइल जवळपास चार-चार तास राहताे़ त्यानंतर मुले टीव्हीसमाेर बसतात़ अभ्यासात तर मुलांचे मनही रमत नाही़ तासन्तास टीव्ही आणि माेबाइलमध्ये व्यस्त असलेल्या मुलांना तहान-भूकही लागत नाही़ जबरदस्तीनेच मुलांना घास भरवावा लागताे़, त्यासाठी टीव्ही, माेबाइलवर त्यांना आवडणारी कार्टून लावावे लागतात़
- मथुरा जाधव
गत मार्च २०२० पासून काेराेनाने लाॅकडाऊन आणि अनलाॅक आहे़ परिणामी, नागरिकांना घरातच बसावे लागत आहे़ विरंगुळा म्हणून टीव्ही पाहत जेवण केले जाते़ मुलांना तर टीव्ही सुुरू करूनच जेवणाला बसवावे लागते़ यातून टीव्ही आणि माेबाइलचा वापर वाढला असून, पाेटांचे विकार वाढत आहेत़
- मीनाक्षी लातूरकर
पाेटविकाराची प्रमुख कारणे
तेलकट पदार्थांचे अधिक सेवन करणे हे आराेग्यासाठी घातक असते. त्याचबराेबर जेवणाच्या वेळा पाळण्याची गरज आहे़ नाश्ता आणि जेवनात अंतर ठेवावे़ रात्रीचे जेवण हे सायंकाळी सहाच्या आत केल्यास ते अधिक उत्तम आहे़ जेवणानंतर लागलीच झाेपल्यास पाेटविकार हाेतात़
शरीराला काेणत्याही प्रकारच्या कष्टाची कामे करण्याची सवय नसणे, अंगात आळशीपणा असणे, हे आराेग्यासाठी घातक आहे़ नियमित व्यायाम, याेगासनाकडे दुर्लक्ष केल्यास पाेटाचे विकार हाेण्याची अधिक शक्यता आहे़ तर दूषित पाणी हे प्रमुख कारण आहे़ त्यासाठी सकस आणि संतुलित आहार घेण्याची गरज आहे़