खरीप हंगाम हातचा गेल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By संदीप शिंदे | Updated: August 30, 2022 16:16 IST2022-08-30T16:16:18+5:302022-08-30T16:16:53+5:30
अतिवृष्टी, गोगायगाय प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान झाले

खरीप हंगाम हातचा गेल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
उजनी (जि.लातूर) : औसा तालुक्यातील उजनी येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने सोमवारी सांयकाळी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत शेतकऱ्याचे नाव अहेमद अजमेर रुईकर (४५) असे आहे. याप्रकरणी भादा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खरिप हंगामातील पिकांचे गोगलगाय, यलो मोझॅक रोगाचा प्रादूर्भाव व अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच पिके हातून जात असल्याने कर्ज कसे फेडणार या विवंचनेतून अहेमद रुईकर यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. उजनी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.