पावसाअभावी खरिपातील पिकांनी टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:33+5:302021-08-15T04:22:33+5:30

लातूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडाे हेक्टरवरील साेयाबीनसह खरिपातील इतर पिकांनी आता माना टाकल्या आहेत. यामुळे ...

Due to lack of rains, kharif crops were discarded | पावसाअभावी खरिपातील पिकांनी टाकल्या माना

पावसाअभावी खरिपातील पिकांनी टाकल्या माना

लातूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडाे हेक्टरवरील साेयाबीनसह खरिपातील इतर पिकांनी आता माना टाकल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मृगाच्या नक्षत्रावर दमदार पावसाने हजेरी लावली. याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली. कालांतराने पावसाने दडी मारली, त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. आता जवळपास दाेन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने दडी मारली आहे. यातून शेकडाे हेक्टरवरील खरिपाचे पीक धाेक्यात आले आहे. उदगीर, चाकूर आणि जळकाेट तालुक्यांतील वाढवणा बु., किनी यल्लादेवी, मन्ना उमरगा, एकुर्का राेड, सुकणी, इस्मालपूर, कल्लूर, खेर्डा, डाेंगरशेळकी, बेळसांगवी, डांगेवाडी, हाळी-हंडरगुळी, सुकणी, आडाेळवाडी, डाेंग्रज, वडगाव एक्की, माेर्तळवाडी, चिमाचीवाडी, डाऊळ, हिप्परगा, गुडसूर परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. लातूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर साेयाबीनचा पेरा घेतला जाताे. जवळपास साेयाबीनचे क्षेत्र ७० टक्क्यांवर आहे. त्यापाठाेपाठ खरिपातील इतर पिकेही घेतली जातात. दरम्यान, साेयाबीनचे पीक जाेमात हाेते. मात्र, गत दाेन आठवड्यांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. कडक उन्हामुळे साेयाबीनचे पीक आता सुकू लागले आहे. यंदाच्या हंगामात लागवड खर्चही निघेल की नाही, याबाबत शाश्वती देता येणार नाही. आता शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने वाढ खुंटली आहे. यातून उत्पादनात माेठ्या प्रमाणावर घट हाेणार असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदाच्या हंगाम धाेक्यात...

उदगीर, जळकाेट आणि चाकूर तालुक्यांतील काही भाग डाेंगराळ आहे तर काही भागातील जमिनी चांगल्या प्रतीच्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडून साेयाबीन आणि इतर पिकांचा पेरा घेतला जाताे. काही शेतकऱ्यांना पाझर तलावाचे पाणी आहे. त्यामुळे त्यांनी ऊसाची लागवड केली आहे. यातून हाती चार पैसे खेळू लागतात. बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी काेरडवाहू आहेत. माळरानावर एकच हंगाम घेता येताे. अशास्थितीत यंदा पावसाने दगा दिल्याने हाती येणारे पीकही धाेक्यात आले आहे. यातून शेतकऱ्यांच्या पदरी लागवड खर्चही पडेल की नाही, हे सांगणे आता कठीण झाले आहे.

Web Title: Due to lack of rains, kharif crops were discarded