जोरदार पावसामुळे डिगोळ - डिग्रस पुलानजीकचा रस्ता गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:53+5:302021-06-17T04:14:53+5:30
डिगोळ : उदगीर - नळेगाव - लातूर मार्गाचे काम वर्षभरापासून सुरु आहे. या मार्गावरील डिगोळ गावाजवळील आणि उदगीर तालुक्याच्या ...

जोरदार पावसामुळे डिगोळ - डिग्रस पुलानजीकचा रस्ता गेला वाहून
डिगोळ : उदगीर - नळेगाव - लातूर मार्गाचे काम वर्षभरापासून सुरु आहे. या मार्गावरील डिगोळ गावाजवळील आणि उदगीर तालुक्याच्या हद्दीतील डिग्रस गावाजवळ पुलाचे काम सुरु असून, वाहनांना ये-जा करण्यासाठी तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने हा रस्ता वाहून गेला. त्यामुळे लातूर - उदगीर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
लातूर - नळेगाव - उदगीर मार्गाचे काम सुरु आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या हद्दीतील डिगोळ गावाजवळील व उदगीर तालुक्याच्या हद्दीतील डिग्रस गावाजवळील पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता पाण्याने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून करडखेल, वायगाव, सताळा बु., सुमठाणा, येरोळ, येरोळमोडमार्गे वाहनधारकांना ये-जा करावे लागली. काही वाहने हेर, रोहिणा, उजळंब, चाकूर, येरोळमोड मार्गाने गेली.
या रस्त्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी निलंग्याचे उपजिल्हाधिकारी विकास माने, शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जटाळ, तलाठी एल. एन. कांबळे यांनी पाहणी करून लवकर दुरुस्तीच्या सूचना संबंधितांना केल्या. त्यामुळे हा रस्ता उकरुन नवीन भराव टाकून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, रस्ता वाहून गेल्याने पुलाजवळील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून नुकसान झाले आहे.