अपघात रोखण्यासाठी चालकांनी कुटुंब डोळ्यासमोर ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:46+5:302021-01-20T04:20:46+5:30
यावेळी जिल्हािधकारी पृथ्वीराज म्हणाले, वाहतूक नियमांची माहिती मुलांमध्ये बिंबवणे गरजेचे आहे. प्रत्येक वाहन चालकाने वाहन चालवित असताना आपले कुटूंब ...

अपघात रोखण्यासाठी चालकांनी कुटुंब डोळ्यासमोर ठेवावे
यावेळी जिल्हािधकारी पृथ्वीराज म्हणाले, वाहतूक नियमांची माहिती मुलांमध्ये बिंबवणे गरजेचे आहे. प्रत्येक वाहन चालकाने वाहन चालवित असताना आपले कुटूंब डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. जेणेकरून ओव्हरटेक, वाहनांचा अतिवेग घेताना काळजी होईल. नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होईल. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच परिवहन विभागाकडून राबविण्यात येणार्या उपाययोजना सांगितल्या. प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक सविता पवार यांनी केले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे यांनी आभार मानले.
वाहतूक नियमांच्या पत्रकाचे अनावरण...
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची पाठशाळा या पत्रकाचे अनावरण यावेळी करण्यात आले. सदरील फलक प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांनी लावावेत, असे आवाहन करण्यात आले. तसेच विना अपघात सेवा बजावणार्या वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे अध्यक्ष खाजाभाई शेख, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पाडे, ऑटोरिक्षा संघटनेचे मच्छिंद्र कांबळे, ट्रॅव्हल्स संघटनेचे अध्यक्ष जगदीश स्वामी आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास एसटी महामंडळ, मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.