वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST2021-05-24T04:18:30+5:302021-05-24T04:18:30+5:30
गॅरेजचालकांवर संकट लातूर जिल्ह्यात गॅरेज सुरू करण्यास परवानगी आहे; परंतु त्यासाठी ७ ते ११ चा कालावधी आहे. या वेळेत ...

वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?
गॅरेजचालकांवर संकट
लातूर जिल्ह्यात गॅरेज सुरू करण्यास परवानगी आहे; परंतु त्यासाठी ७ ते ११ चा कालावधी आहे. या वेळेत वाहने येणे अशक्य आहे. परिणामी, वाहनेच येत नसल्याने उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. कामासाठी असलेली मुले, दुकानाचे भाडे कसे भरावे, असा प्रश्न गॅरेजचालकांमधून उपस्थित केला जात आहे.
वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर
फायनान्स कंपनीकडून लोन घेऊन अनेकांनी चारचाकी वाहने घेतली आहेत. त्याचे हप्ते थकत आले आहेत. त्यातच प्रवासी वाहतूक बंद आहे. विवाह समारंभासाठी नियम असल्याने मोजकीच उपस्थिती राहत आहे. परिणामी, गाड्यांचा दरवर्षीचा हंगाम यावर्षी थंडावला आहे. त्यामुळे वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर निर्माण झाला आहे.
वाहने उभी असल्याने गॅरेजवर शुकशुकाट
प्रवासी वाहने एकाच जागी उभी आहेत. परिणामी, गॅरेजवर वाहनेच येत नसल्याचे चित्र आहे. मोजक्याच वेळेत किती वाहनांची दुरुस्ती करणार. शासनाने अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करून गॅरेज पूर्णवेळ उघडे ठेवण्यास मुभा द्यावी.
-जावेद सय्यद, गॅरेज मालक
गेल्या दोन महिन्यांपासून संचारबंदी आहे. त्यामुळे हाताला काम मिळत नाही. ज्यादिवशी गाडी दुरुस्तीसाठी येईल, त्याचदिवशी बोलावले जात आहे. कोरोनामुळे अर्थचक्र कोलमडले आहे. गॅरेज पूर्णवेळ उघडण्यास मुभा द्यावी.
- इस्राईल शेख
वाहने पार्किंगमध्येच
चारचाकी वाहने गेल्या दोन महिन्यांपासून पार्किंगमध्येच आहेत. बाहेर जाण्याचा योगच आलेला नाही. दुचाकी असल्याने त्यावरच बाहेर जातो. मात्र, सध्या संचारबंदी असल्याने कुठेही जाणे अशक्य आहे.
-ऋषिकेश महामुनी
घरी केवळ दुचाकी आहे. संचारबंदी असल्याने बाहेर जाणे टाळावे लागत आहे. त्यामुळे गाडी दुरुस्तीसाठी, नियमित सर्व्हिसिंगसाठी नेली नाही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गाडीची दुरुस्ती करू.
-महेश पाटील