हिंगोली येथील चालकाने लातुरात केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 12:01 IST2021-09-12T12:01:46+5:302021-09-12T12:01:54+5:30
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हिंगोली येथील चालकाने लातुरात केली आत्महत्या
लातूर : हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस क-हाळे येथील चालकाने लातुरातील अंबाजोगाई रोडवर एका ब्लड बॅकेच्या छतावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे समोर आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, मयत संदीप न्यानोबा क-हाळे (२६, रा डिग्रस क-हाळे ता. जि. हिंगोली) हे लातुरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या ब्लड बॅकेतील एका नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांनी शनिवारी रात्री १२ ते रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास ब्लड बॅकेच्या छतावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नयन शंकरराव इंगोले (२८, रा. आनंद नगर, लातूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोहेका. कृष्णा गारोळे करीत आहेत.