पक्क्या घराचे स्वप्न लटकले; घरकुल योजनेचा निधी केंद्र शासनाकडेच थकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:10+5:302021-07-20T04:15:10+5:30

मोफत वाळू मिळेना; साहित्यही महागले ! आतापर्यंत लातूर शहरातील ३ हजार ७२१ जणांना अनुदान मंजूर झाले आहे. त्यांना केंद्र ...

The dream of a permanent home hung; Funding for Gharkul scheme goes to Central Government! | पक्क्या घराचे स्वप्न लटकले; घरकुल योजनेचा निधी केंद्र शासनाकडेच थकला !

पक्क्या घराचे स्वप्न लटकले; घरकुल योजनेचा निधी केंद्र शासनाकडेच थकला !

मोफत वाळू मिळेना; साहित्यही महागले !

आतापर्यंत लातूर शहरातील ३ हजार ७२१ जणांना अनुदान मंजूर झाले आहे. त्यांना केंद्र शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्यासाठी एक लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. केंद्र शासनाकडून प्रत्येकी दीड लाखाचा निधी अद्याप आला नाही.

२८०१ आणि त्यापूर्वी ९१० असे एकूण ३७२१ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून पैसे आले आहेत. त्यानुसार या लाभार्थ्यांना ४० हजारांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. - वडगावे

अपुरे अनुदान, तेही वेळेत नाही

दीड ते पावणे दोन वर्ष झाले. घरकुलाचे बांधकाम चालू आहे. पहिला हप्ता आला. त्यानंतर हप्ता आला नाही. राहण्याची गैरसोय झालेली आहे. शासनाकडून पैसे येतील, त्याची वाट पाहत आहोत.

- श्रीमंत ससाणे

छताचे घर बांधून दिले जाते म्हणून महानगरपालिकेत अर्ज करण्यात आला आहे. कागदपत्राला पैसे घालून प्रस्ताव दाखल केला; परंतु अद्याप मंजुरी नाही. अनेकदा चकराही मारल्या; परंतु घरकुल मंजूर नाही.

- बाबूलाल शेख

Web Title: The dream of a permanent home hung; Funding for Gharkul scheme goes to Central Government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.