डॉ. भालचंद्र कराड यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:35+5:302021-06-22T04:14:35+5:30
लातूर : श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात सोमवारी प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड यांचा सेवागौरव समारंभ पार पडला. यावेळी कार्यवाह नितीन शेटे, ...

डॉ. भालचंद्र कराड यांचा सत्कार
लातूर : श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात सोमवारी प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड यांचा सेवागौरव समारंभ पार पडला. यावेळी कार्यवाह नितीन शेटे, उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, प्रा. चंद्रकांत मुळे, प्रकाश दुगड, अमरनाथ खुर्पे, अभय कोकड, प्राचार्य डॉ. महेश देशमुख, विमलताई कराड, प्रेमकिशोर मानधने, मुख्याध्यापक बाबुराव आडे, विश्वास जोशी, प्रदीप जोशी, जगदीश साखरे, तुकाराम येवले, स्वाती बलखंडे, प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांच्यासह प्रा. संतोष लिंबकर, प्रा. अशोक होके, अतुल कराड, प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर, डॉ. रमेश गटकळ, प्रा. जिजाराम बागल, प्रा. अभय येवतेकर आदी उपस्थित होते.
महावितरणकडून ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण
लातूर : महावितरणच्या लातूर विभागातील ग्राहकांच्या वीजबिल तक्रारीचे निवारण करण्यासाठी लातूर, मुरुड, व रेणापूर उपविभाग
कार्यालयामध्ये शासनाने दिलेल्या कोव्हिड १९ सुचनाचे पालन करुन ग्राहक तक्रार मेळावे शुक्रवारी घेण्यात आले. मेळाव्यात ८६ वीज ग्राहकांचे
वीजबील दुरुस्त करण्यात आले. त्यापैकी २० ग्राहकांनी तात्काळ वीजबीलाच्या रकमेचा भरणा केला. कार्यकारी अभियंता गणेश सामसे यांनी मुख्य अभियंता रविद्र कोलप आणि अधिक्षक अभियंता दिलीप भेाळे यांच्या सुचनेनुसार ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. लातूर शहरातील उत्तर आणि दक्षिण उपविभागासह लातूर ग्रामीण, मुरुड आणि रेणापूर उपविभागीय कार्यालयात झालेल्या ग्राहक मेळाव्यास सर्व अभियंते आणि वित्त व लेखा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.