शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

दबदबा कायम! राज्यात दहावीत शंभर टक्के गुण घेणारे ५० टक्के विद्यार्थी लातूरचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:24 IST

बावन्नकशी सोन्याने निकालाची परंपरा कायम ठेवून लातूरचा लौकिक वाढविला आहे.

लातूर : राज्यात दहावी बोर्ड परीक्षेत २११ विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळविले असून त्यात लातूर विभागातील ५० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तब्बल ११३ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवून लातूर पॅटर्नचा दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. हाती आलेल्या निकालानुसार लातूर शहरातील श्री केशवराज विद्यालयातील १३, देशीकेंद्र १०, सरस्वती विद्यालय ५, सोमाणी, स्वामी विवेकानंद आणि जिजामाता कन्या प्रशालेतील प्रत्येकी २, परिमल आणि विद्याविकास विद्यालयातील विद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याने शंभर टक्के गुण मिळवून लातूरचा लौकिक वाढविला आहे.

दहावी परीक्षेसाठी लातूर विभागातून १ लाख ५ हजार ६१९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी ९७ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.७७ टक्के आहे. एकूण मुलांपैकी ५१ हजार ६९९ मुले पास झाली असून ४६ हजार २९१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.४७ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४९ टक्के आहे. लातूर विभागात लातूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्याचा निकाल ९२.२६ टक्के लागला आहे. धाराशिव जिल्हा विभागात प्रथमस्थानी असून ९५.३७ आणि नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर असून ९१.९३ टक्के निकाल लागला आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३३ हजार ६९८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणीत ३२ हजार ३३५, द्वितीय श्रेणीत २४ हजार २८० आणि पास श्रेणीत ७ हजार ६७७ विद्यार्थी आहेत.

४४६ शाळांचा शंभर टक्के निकाललातूर विभागात ४४६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. १० शाळांचा शून्य टक्के निकाल लागला असून ९० ते ९९ टक्के निकाल लागलेल्या ७७१ शाळा आहेत. तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेले ७ हजार ३७८ विद्यार्थी आहेत.

बावन्नकशी सोनंशंभरपैकी शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर शहरातील विद्यार्थी सर्वाधिक आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार तब्बल ४५ विद्यार्थी एकट्या लातूर शहरातील आहेत. या बावन्नकशी सोन्याने निकालाची परंपरा कायम ठेवून लातूरचा लौकिक वाढविला आहे. ज्या शाळांच्या निकालाचा आलेख दरवर्षी वाढत आहे, त्या लातूर शहरातील शाळांनी यावर्षीच्या निकालात ही आपला दबदबा कायम ठेवला आहे, असे या निकालावरून स्पष्ट होते.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालlaturलातूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र