कोरोनाकाळात धावपळीने घटले डॉक्टरांचे वजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:36+5:302021-05-26T04:20:36+5:30

अनेक डॉक्टर आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सकस आहार व नियमित व्यायामावर भर देत आहेत. गतवर्षी मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना विषाणू ...

Doctor's weight dropped dramatically during coronation! | कोरोनाकाळात धावपळीने घटले डॉक्टरांचे वजन !

कोरोनाकाळात धावपळीने घटले डॉक्टरांचे वजन !

अनेक डॉक्टर आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सकस आहार व नियमित व्यायामावर भर देत आहेत. गतवर्षी मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने शिरकाव केला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात काेरोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. उपलब्ध डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा आजार नवाच होता. आजारावर प्रारंभी लसही नव्हती. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्रीही अपुरीच होती. शिवाय, आरोग्य विभागात डॉक्टरांची रिक्त पदेही होती. अशा स्थितीतही डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेला प्राधान्य देत कोरोनाशी दोन हात करत आहेत. वेळप्रसंगी डॉक्टरांना १२ ते २४ तासही ड्युटी करावी लागत आहे. या काळात कामाचा वाढलेला व्याप, त्यामुळे होणारी धावपळ यामुळे डॉक्टरांचे आरोग्याकडेही दुर्लक्ष होऊ लागले. परिणामी, अनेक डॉक्टरांचे ५ ते ७ किलो वजन घटले आहे. दरम्यान, सध्या डॉक्टर आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सकस आहार, योगासने, नियमित व्यायाम करण्यावर भर देत आराेग्याची काळजी घेत आहेत.

पॉइंटर्स

वैद्यकीय विज्ञान संस्था - १

डॉक्टर्सची संख्या - ३५०

आरोग्य कर्मचारी - ५५०

प्रतिक्रिया...

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भाव आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची काळजी घ्यावी लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कामाचा व्याप वाढला आहे. अधिकचे तास कोविड केअर सेंटरमध्ये थांबावे लागते. यामुळे जेवणाच्या वेळेत बदल झाला आहे. तीन ते चार किलोने वजनात घट झाली आहे. सध्या सकस आहार आणि व्यायामावर भर देत आहे. थोडी धावपळ आहे, पण रुग्णसेवा करण्याची संधी मिळत आहे.

- डॉ. मारुती कराळे, नोडल अधिकारी, लातूर

कोरोनाच्या संसर्गामुळे अधिक वेळ रुग्णसेवेला द्यावा लागत आहे. दीड वर्षांपासून आहार आणि तब्येतीकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. त्यामुळे वजन कमी झाले आहे. मात्र, आता नियमित व्यायाम, योग, प्राणायाम करीत आहे. सकस आहार घेत असून, आरोग्याकडे विशेष लक्ष आहे.

- डॉ. शैलेंद्र चव्हाण, लातूर

सकस व पौष्टिक आहार

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे कामाचा व्याप वाढला आहे, त्यामुळे ताणतणाव वाढतो. या काळात शारीरिक व मानिसक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी डॉक्टर सकाळी धावणे, योग, विपश्यना करून ताण घालवत आहेत. त्याचबरोबर आहाराकडेही विशेष लक्ष देत आहेत. सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री जेवण करीत आहेत. फळे व भाज्या तसेच प्रॉटिनयुक्त आहार घेण्याकडे सध्या डॉक्टरांचा कल आहे. वजन वाढू नये यासाठी तळलेले पदार्थ खाण्याचे टाळत आहेत.

Web Title: Doctor's weight dropped dramatically during coronation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.