जिल्ह्याची हिवतापमुक्तीकडे वाटचाल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST2021-05-01T04:17:57+5:302021-05-01T04:17:57+5:30
यावेळी डॉ. ढगे यांनी सन २०२१ या वर्षात एकही हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया आजाराचा रुग्ण आढळला नसल्याचे सांगितले, तसेच कीटकजन्य ...

जिल्ह्याची हिवतापमुक्तीकडे वाटचाल सुरू
यावेळी डॉ. ढगे यांनी सन २०२१ या वर्षात एकही हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया आजाराचा रुग्ण आढळला नसल्याचे सांगितले, तसेच कीटकजन्य आजारासंदर्भात माहिती दिली. जिल्ह्यात हिवतापाचा रुग्ण आढळू नये, याची आरोग्य विभागाने आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
रुग्णसंख्येत दरवर्षी घट...
सन २०१९ मध्ये जिल्ह्यात एकूण ४ लाख ५४९ रक्तनमुने गोळा करण्यात आले होते. त्यात हिवतापाचे ३ रुग्ण आढळून आले. सन २०२० मध्ये २ लाख ९९ हजार १८८ रक्तनमुने गोळा करण्यात आले होते. त्यात हिवतापाचे ७ रुग्ण आढळले, तसेच सन २०२१ मार्चअखेरपर्यंत ७२ हजार ७१० रक्तनमुने गोळा करण्यात आले. मात्र, एकही हिवतापाचा रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर.आर. शेख यांनी दिली.