नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:01+5:302021-09-10T04:27:01+5:30

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवार, पोलीस अधिकारी लाकाळ, प्रभारी तालुका कृषी अधिकारी ...

District Collector inspected the damaged farm | नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवार, पोलीस अधिकारी लाकाळ, प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजयकुमार गायकवाड, मंडळ अधिकारी सुभाष तांदळे, सपोनि. शैलेश बंकवाड, सरपंच संभाजी गायकवाड, उपसरपंच बालाजी चाटे, पोलीस पाटील संग्राम बरूरे, तलाठी हंसराज जाधव, तलाठी विजय गाडेकर, ग्रामसेवक सुनील कांबळे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

चिखली गावाच्या उत्तर दिशेला असलेला पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच शिवारातील एक पाझर तलाव फुटला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. फुटलेल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधला.

दरम्यान, किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन लसीकरणाबाबतची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, सरपंच किशोर मुंडे आदींची उपस्थिती होती.

चिखली येथील दोन पाझर तलाव फुटल्याने शिवारातील जवळपास २५ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा सुरू आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: District Collector inspected the damaged farm