दयानंद संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:42+5:302021-05-26T04:20:42+5:30
यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले. ...

दयानंद संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप
यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले. मंचावर प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. दिलीप जगताप, पर्यवेक्षक प्रा. मिलिंद माने, प्रा. हेमंत वरुडकर, जेईई समन्वयक प्रा. रविकुमार, प्रा. डी. एम. सूर्यवंशी, प्रा. गोपीकृष्ण, महेंद्र कोराळे, प्रा. कैले, प्रा. यादव, प्रा. शेळगे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. बळवंत सूर्यवंशी यांनी, तर आभार प्रा. मिलिंद माने यांनी मानले.
विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी उपक्रम...
कोरोनाच्या काळात संस्थेने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा उपक्रम राबविला आहे. पालक मेळाव्यात घोषणा केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना टॅब वाटप केले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यास अभ्यास करणे व परीक्षा देणे अतिशय सोपे होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी दयानंद शिक्षण संस्था सदैव तत्पर राहील, असा विश्वास संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी यांनी व्यक्त केला.