गरजू महिलांना साडी- चोळी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST2021-01-18T04:17:30+5:302021-01-18T04:17:30+5:30
प्रा. बालाजी आचार्य यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती गंगासागर जाभाडे होत्या. यावेळी माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, ...

गरजू महिलांना साडी- चोळी वाटप
प्रा. बालाजी आचार्य यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती गंगासागर जाभाडे होत्या. यावेळी माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, माजी नगरसेवक शाहुताई कांबळे, शकुंतला बनसोडे, धम्मज्योती गायकवाड, रसिका बनसोडे, सुरेखा ससाने, द्रौपदीबाई कांबळे गंगाखेडकर यांच्यासह श्रीकांत बनसोडे, प्रशांत कांबळे, राहुल ढवळे, रुपेश कांबळे, जंगले यांचीही उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या वतीने गरजू ३५१ महिलांना साडी- चाळी वाटप करण्यात आली.
सूत्रसंचालन संयोजक अरुण वाघंबर यांनी केले. अंजलीताई वाघंबर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी माधव झुबरे, आकाश व्यवहारे, आदित्य वाघंबर, शुभम वाघंबर, सुमित वाघंबर, चंद्रकांत कांबळे, रितेश वाघंबर यांनी परिश्रम घेतले. दिवसभर महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमशाहीर सोनबा सिरसाठ, प्रज्ञा लोखंडे आणि चमूचा बुध्द - भीम गीतांचा कार्यक्रम झाला.