लामजना परिसरातील ९५० निराधारांना घरपोहोच अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:27+5:302021-05-26T04:20:27+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येऊन लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाच्या विविध योजनांतून निराधार, दिव्यांग, विधवा, ...

लामजना परिसरातील ९५० निराधारांना घरपोहोच अनुदान वाटप
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येऊन लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाच्या विविध योजनांतून निराधार, दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींना अनुदानाचे वाटप करण्यात येते. कोरोनाच्या संकटामुळे सदरील लाभार्थींची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने अनुदान त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. परंतु ये- जा करण्यासाठी वाहनाची सुविधा नसल्याने निराधारांची अडचण होत आहे. तसेच बँकेतही गर्दी होत आहे. त्यामुळे निराधारांची सोय व्हावी म्हणून लामजना येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या वतीने लामजना, मोगरगा, उत्का, तपसे चिंचोली, गाढवेवाडी, जोगन चिंचोली, दावतपूर या गावांतील एकूण ९५० निराधारांना घरपोहोच अनुदान देण्यात आले.
यावेळी शाखाधिकारी एम. एच. शिंदे, लिपिक आर. जी. एकंबे, रोखपाल डी. एस. इंगळे, सोसायटी चेअरमन चंद्रशेखर सोनवणे, दत्तात्रय मुळे, मल्लिकार्जुन मुळे, अजित सोनवणे, वैजनाथ डिगुळे आदींनी सहकार्य केले.