प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत हेल्थ कार्डचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:44+5:302021-05-31T04:15:44+5:30
लातूर : कोरोनामुळे आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेल्या जिल्हाभरातील १७७ जणांच्या १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित ...

प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत हेल्थ कार्डचे वाटप
लातूर : कोरोनामुळे आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेल्या जिल्हाभरातील १७७ जणांच्या १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत हेल्थ कार्ड देऊन संपूर्ण आरोग्य सेवा मोफत देण्याच्या संकल्पाचा आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
रेणापूर येथील शिवराम बेंबडे मेमोरिअल रुग्णालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील अनेक गावातील भाजपा लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामदेवतांची महापूजा करून आ. कराड यांना दीर्घायुष्य लाभो तसेच मानव जातीवर कोरोनाचे आलेले संकट दूर होवो, असे साकडे घातले.
संपर्क कार्यालयात आ. कराड यांना जन्मदिवसानिमित्त सज्जनकुमार लोणाळे, संतोष वाघमारे, सुरेंद्र गोडभरले, प्रशांत पाटील, वसंतराव डिघोळे, मनीष बंडेवार, शिरीष कुलकर्णी, श्वेता यादव, वैशाली लोंढे, सतीश आंबेकर, अॅड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, अभिषेक अकनगिरे, गोविंद नरहरे, जगदीश कुलकर्णी, हनुमंतबापू नागटिळक, शामसुंदर वाघमारे, अनंत कणसे, वैभव सापसोड, भैरवनाथ पिसाळ, अॅड. धनराज शिंदे, समाधान कदम, सिद्धेश्वर मामडगे, अनंत कोरे, भागवत सोट, तुकाराम मद्दे, राजकुमार मजगे, बालासाहेब गुट्टे, शिवाजी बैनगिरे, ललिता कांबळे, अमित रेड्डी, सिद्धेश्वर पवार, रामलिंग शेरे, रणजित मिरकले, वसंत करमुडे, गोविंद कराड, संतोष चव्हाण, प्रताप पाटील, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, राजकिरण साठे, बाबा भिसे, काशिनाथ ढगे, धावणे गुरुजी, शिवासिंह सिसोदिया यांच्यासह लातूर एमआयटीचे डॉ. एन.पी. जमादार, डॉ. बस्वराज नागोबा, डॉ. सरिता मंत्री, डॉ. सुरेश कांबळे, डॉ. एच. एच. जाधव, डॉ. पल्लवी जाधव, सचिन मुंडे आदींनी शुभेच्छा दिल्या.