निराधारांना गावातच अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST2021-05-29T04:16:26+5:302021-05-29T04:16:26+5:30
अहमदपूर : कोरोनाच्या संकटामुळे कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे निराधारांना बँकेत जाऊन अनुदानाची रक्कम काढणे कठीण झाले आहे. आमदार ...

निराधारांना गावातच अनुदान वाटप
अहमदपूर : कोरोनाच्या संकटामुळे कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे निराधारांना बँकेत जाऊन अनुदानाची रक्कम काढणे कठीण झाले आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सूचनेवरुन सुनेगाव, शेनी, शेंद्री येथील निराधारांना गावातच अनुदानाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे निराधारांना आधार मिळाला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे एस. टी. सेवा बंद आहे. त्यामुळे खेड्यातील निराधारांना बँकेतील अनुदान काढण्यासाठी अडचणी येत होत्या. तसेच बँकेतही गर्दी होण्याची शक्यता असल्याने आमदार बाबासाहेब पाटील यांनी निराधारांना घरपोच अनुदान देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सुनेगाव, शेनी, शेंद्री येथील माजी चेअरमन मोतीराम जायभाये यांच्या पुढाकाराने राम जायभाये, गोविंद काळे, गोपीनाथ जायभाये यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकांना घरपोच पैसे देण्याची मागणी केली. त्यानुसार बँकेने हा घरपोच पैसे देण्याचा उपक्रम राबवला. सरपंच उषा जायभाये, मोतीराम जायभाये यांच्या हस्ते निराधारांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील निराधारांसह राम जायभाये, गोविंद काळे, गोपीनाथ जायभाये, आदी उपस्थित होते.