मध्यवर्ती बँकेच्या १०० शाखेतून निराधारांना अनुदानाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:21 IST2021-05-25T04:21:57+5:302021-05-25T04:21:57+5:30
तालुकानिहाय मदतीचे वितरण... निराधारांना मिळालेल्या अनुदानाचे तालुकानिहाय वाटप करण्यात येत असून, लातूर १ कोटी १६ लाख १४ हजार रुपये, ...

मध्यवर्ती बँकेच्या १०० शाखेतून निराधारांना अनुदानाचे वाटप
तालुकानिहाय मदतीचे वितरण...
निराधारांना मिळालेल्या अनुदानाचे तालुकानिहाय वाटप करण्यात येत असून, लातूर १ कोटी १६ लाख १४ हजार रुपये, औसा १ कोटी २७ लाख १४ हजार रुपये, निलंगा ५० लाख ५० हजार, उदगीर ४५ लाख ५२ हजार रुपये, अहमदपूर ४६ लाख ७० हजार रुपये, चाकूर ४४ लाख १८ हजार रुपये, रेणापूर ३९ लाख ६७ हजार रुपये, जळकोट ४ लाख ५० हजार रुपये, देवणी १९ लाख ८० हजार, शिरूर अनंतपाळ ७२ लाख २५ हजार असे एकूण ५ कोटी ६७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
उर्वरित अनुदानाचे लवकरच वाटप...
आतापर्यंत २१ हजार २२८ लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला आहे. उर्वरित अनुदान थेट लाभार्थ्यांना घरपोच देणार आहे. प्रत्येक गावनिहाय लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले जाणार असल्याचे चेअरमन ॲड. श्रीपतराव काकडे, व्हॉइस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, सन्माननीय संचालक मंडळ यांनी सांगितले.