साई फाऊंडेशनच्या वतीने धान्य किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:45+5:302021-06-02T04:16:45+5:30
शिरुर अनंतपाळ येथील पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या गायरान जागेवर गत पंचवीस वर्षांपासून हातावर पोट असणारी कुटुंबे राहतात. कोरोनामुळे ...

साई फाऊंडेशनच्या वतीने धान्य किटचे वाटप
शिरुर अनंतपाळ येथील पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या गायरान जागेवर गत पंचवीस वर्षांपासून हातावर पोट असणारी कुटुंबे राहतात. कोरोनामुळे या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे कळताच साई फाऊंडेशनच्या वतीने ॲड. रुद्राली पाटील चाकूरकर, ऋषिका पाटील चाकूरकर यांनी मदतीचा हात दिला आहे. किटमध्ये तांदूळ, गहू, साखर, गोडेतेल, चहापत्ती, आटा आदी साहित्याचा समावेश आहे. यावेळी शुभम पाटील, अनिकेत पाटील, अनिरुद्ध पाटील, समीर पठाण, राहुल तीपन्ना, रामेश्वर पाटील, दत्ता कारंडे, ओमप्रकाश झुरळे, डॉ. अरविंद भातांब्रे, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, किरण कोरे, ऋत्विक सांगवे, महादेव आवाळे, अशोक कोरे, वीरभद्र बेंबळगे, सुचित लासुने, वीरभद्र भातांब्रे, परमेश्वर तोंडारे, आदेश पारशेट्टे, परमेश्वर शेनुरे, सूरज चाकोते यांची उपस्थिती होती.
आरोग्यविषयक जनजागृती...
साई फाऊंडेशनच्या ॲड. रुद्राली पाटील चाकूरकर आणि ऋषिका पाटील चाकूरकर यांनी महिलांना आरोग्यविषयक माहिती देऊन लसीकरणाचे महत्त्व सांगितले. सॅनिटरी नॅपकिनचा वापर करून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या टप्प्यात येथील उर्वरित कुटुंबाना धान्य किटसह आरोग्य किटचेसुद्धा वाटप केले जाणार असल्याचे ॲड. रुद्राली पाटील चाकूरकर यांनी सांगितले.