माणुसकीचे दर्शन पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:36+5:302021-06-29T04:14:36+5:30

प्रा. पद्मजा गिराम यांचा लातुरात सत्कार लातूर : येथील चन्नबसवेश्वर फार्मासीच्या प्रा. पद्मजा गिराम यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा ...

Distribution of the Darshan Award of Humanity | माणुसकीचे दर्शन पुरस्काराचे वितरण

माणुसकीचे दर्शन पुरस्काराचे वितरण

प्रा. पद्मजा गिराम यांचा लातुरात सत्कार

लातूर : येथील चन्नबसवेश्वर फार्मासीच्या प्रा. पद्मजा गिराम यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची फार्मास्युटिकल सायन्सेस या विषयाची पीएच.डी. पदवी प्रदान केली. या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव भीमाशंकर देवनीकर, अरुण हळकुडे, प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी, प्राचार्य डॉ. संजय थोंटे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन प्रा. संदीप सूर्यवंशी यांनी केले.

स्मृती गौरव पुरस्काराने बिभीषण सांगवीकर सन्मानित

लातूर : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने डॉ. रोहिदास वाघमारे स्मृती गौरव पुरस्कारराष्ट्रीय चर्मकार महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष बिभीषण सांगवीकर यांना देऊन राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी डाॅ. शांताराम कारंडे, दत्तात्रय गोतिशे, महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहलताई आंबेकर, कीर्तनकार बावळे महाराज, दीपक पाटील कर्जतकर, ॲड. लोहकरे, राजेश खाडे, उपाध्यक्षा संगीताताई वाघमारे, पंढरीनाथ पवार, भानुदास विसावे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयात अभिवादन

लातूर : लातूर शहरातील सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ठकू परसराम जाधव, देवराव जोगदंडे, वाचनालय सचिव बाळकृष्ण होळीक, संजय सूर्यवंशी, लिपिक संकेत होळीकर, नितीन चालक, तुकाराम रोकडे आदींची उपस्थिती होती. शाहू महाराजांमुळे बहुजनांच्या प्रगतीचे मार्ग खुले झाले. त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव करण्यासाठी शब्द नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले.

अंजली कोटलवार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

लातूर : महाराष्ट्र आर्य वैश्य महिला महासभेच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी अंजली श्रीकांत कोटलवार यांची निवड करण्यात आली़ कार्यकारिणीत उपाध्यक्ष उषा बट्टेवार, सुजाता पंदीलवार, अश्विनी गादेवार, सचिव सरोजा चिंतलवार, सहसचिव ज्योती चिद्रेवार, राधिका वट्टमवार, मंजूषा पारसेवार, शुभांगी वट्टमवार, मीरा देवशेटवार तर सदस्यपदी सीमा वट्टमवार, नीलिमा पारसेवार, शीतल मद्रेवार यांचा समावेश आहे़

Web Title: Distribution of the Darshan Award of Humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.