दिव्यांगांना सहायता उपकरणांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:26+5:302021-06-16T04:27:26+5:30
पोस्टर प्रदर्शनातून नेत्रदान जनजागृती लातूर : जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील नेत्ररोग विभाग ...

दिव्यांगांना सहायता उपकरणांचे वितरण
पोस्टर प्रदर्शनातून नेत्रदान जनजागृती
लातूर : जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील नेत्ररोग विभाग येथे नेत्रदान या विषयावर पोस्टर प्रदर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन नेत्रदानाविषयी जनजागृती केली. यावेळी कार्यकारी संचालक तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, डॉ. बी. एस. नागोबा, डॉ. सरिता मंत्री, एच. एच. जाधव, प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, डॉ. अरुणकुमार राव, डॉ. नामदेव कुलकर्णी, डॉ. सी. एस. पाटील, डॉ. विद्या कांदे, डॉ. अरुण दैठणकर, डॉ. मालू, डॉ. काळे, डॉ. शैला बांगड, श्रीपती मुंडे, आदींसह डॉक्टर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
भामरी चौकात वृक्षारोपण उपक्रम
लातूर : शहराजवळील भामरी गावात वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पर्यावरणपूरक विविध झाडांची लागवड करण्यात आली. सुजित चव्हाण यांनी प्रत्येकाने वृक्षारोपण करून एक तरी झाड सांभाळावे, असे आवाहन या माध्यमातून केले. कार्यक्रमाला सुजित चव्हाण, अमोल स्वामी, राहुल माशाळकर, रितेश राजे, शिवराज मुळावकर, अक्षय चवळे, नितीन शिंदे, अमर बुरबुरे, आदींची उपस्थित होते.
आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने मास्क वितरण
लातूर : कोरोनाच्या संकट काळात आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने आर्ट ऑफ लिव्हिंग व आंतरराष्ट्रीय मानवी मूल्य संघटना यांच्यातर्फे ६० हजार ट्रिपल लेअर मास्कचे हस्तांतरण लातूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्याकडे करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय मानवी मूल्य संघटनचे रमेश रमण, आर्ट ऑफ लिव्हिंग, लातूरचे जिल्हा समन्वयक संजय घुगे उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाशी संलग्न असलेल्या अनेक रुग्णालयांत या मास्कचे वितरण होईल, अशी माहिती डॉ. एल. एस. देशमुख यांनी यावेळी दिली.