शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम वाटप करा, मोफत बी-बियाणे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST2021-05-29T04:16:16+5:302021-05-29T04:16:16+5:30
वर्षभरापासून कोरोनाचे संकट सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या मंजूर पीकविम्याचे ...

शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम वाटप करा, मोफत बी-बियाणे द्या
वर्षभरापासून कोरोनाचे संकट सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या मंजूर पीकविम्याचे तत्काळ वाटप करावे. शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे देण्यात यावीत. लाॅकडाऊन काळात शेतमजूर, बांधकाम कामगार व इतर मजुरांना निर्वाह भत्ता देण्यात यावा. डिझेल, पेट्रोल व खाद्य तेलाच्या वाढत्या किमती त्वरित कमी कराव्यात. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर लसीकरण करून शाळा पूर्ववत सुरू कराव्यात. १० वी व १२ वीच्या परीक्षेसंदर्भात सुरू असलेला संभ्रम शासनाने लवकर दूर करावा. कोरोनात आई-वडील दगावल्याने अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व शासनाने स्वीकारावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सहदेव होनाळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. त्यावर जिल्हा उपाध्यक्ष सुनील दहिकांबळे, महासचिव प्रल्हाद ढवळे, सारीपुत्र ढवळे, बाबासाहेब वाघमारे, विनयकुमार ढवळे, संतोष गायकवाड, मौलाना बिलाल शेख, तबरेज सय्यद, संजय वाहुळे, तुकाराम कांबळे, आदित्य वाहुळे, सचिन शृंगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.