पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद; पान टपरी चालकाच्या गळ्यावर ब्लेडचे वार !
By संदीप शिंदे | Updated: June 9, 2023 16:12 IST2023-06-09T16:12:39+5:302023-06-09T16:12:57+5:30
याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद; पान टपरी चालकाच्या गळ्यावर ब्लेडचे वार !
उदगीर : येथील एका बारसमोर असलेल्या पान टपरीवर पैशाच्या कारणावरुन झालेल्या भांडणात पानटपरी चालकाच्या गळ्यावर ब्लेडने मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, गुरुवारी रात्री सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उदगीर शहरातील एका बारसमोर असलेल्या पान टपरीवर पैशाच्या कारणावरून पानटपरी चालकास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच गळ्यावर हातातील ब्लेडने मारून जखमी केले. याप्रकरणी आकाश बालाजी वाकुडे रा. बनशेळकी रोड यांच्या तक्रारीवरुन संतोष शिवाजी आयनीले रा. बोरोळ ता. देवणी याच्याविरुद्ध उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.