कोरोना रुग्णांच्या घरातील कचऱ्याचे निर्जंतुकीकरण करून विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST2021-04-14T04:17:49+5:302021-04-14T04:17:49+5:30
कचऱ्यावर फवारणी करून जमिनीत बुजविला जातो जेसीबीद्वारे खड्डा खोदून या कचऱ्यावर फवारणी करून निर्जंतुकीकरण करून बुजविला जातो. आरोग्य विभागाने ...

कोरोना रुग्णांच्या घरातील कचऱ्याचे निर्जंतुकीकरण करून विल्हेवाट
कचऱ्यावर फवारणी करून जमिनीत बुजविला जातो
जेसीबीद्वारे खड्डा खोदून या कचऱ्यावर फवारणी करून निर्जंतुकीकरण करून बुजविला जातो. आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, या कचऱ्याचे विल्हेवाट लावली जात आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांचे घर आणि शहरातील दहा ते बारा कोविड हॉस्पिटलमधील दररोज चार टन कचऱ्याची या पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.
- रमाकांत पिडगे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक
गृहविलगीकरणातील रुग्णांना स्वतंत्र ठेवले जाते. ज्यांची व्यवस्था आहे, अशांनाच गृहविलगीकरणासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचा संपर्क घरातील इतर सदस्यांशी होणार नाही, याची काळजी घेण्याचे सांगितले आहे, शिवाय त्यांच्या रूममधील कचरा डिस्पोजल आहे. काळजी घेतल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका नाही. फिनेल, डेटॉल, सोडियम हायड्रोक्लोराइड आदी निर्जंतुकीकरणाचे लिक्विड गृहविलगीकरणातील रुग्ण करतात. त्यामुळे संसर्ग होण्याची भीती नाही.
कचरा एकत्र करणारे कर्मचारी.