पवित्र रमजानचा रोजा असलेल्या शिक्षकांना कामात सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST2021-05-09T04:19:58+5:302021-05-09T04:19:58+5:30
सध्या शाळेला सुट्ट्या असल्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. यात मुस्लीम बांधव शिक्षक, शिक्षिकांनाही नियुक्ती ...

पवित्र रमजानचा रोजा असलेल्या शिक्षकांना कामात सवलत
सध्या शाळेला सुट्ट्या असल्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. यात मुस्लीम बांधव शिक्षक, शिक्षिकांनाही नियुक्ती देण्यात आली आहे; पण सध्या रमजान महिना चालू असल्याने आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता, ज्या शिक्षक, शिक्षिकांचा रोजा (उपवास) आहे. त्यांना १४ मे पर्यंत कार्यमुक्त करण्याची व त्यांना या कामातून सूट देण्याची मागणी औसा शिक्षक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे
निवेदनाद्वारे केली होती; तसेच पाठपुरावाही केला होता. त्याची दखल घेऊन या सूचना तालुक्यातील मुख्याध्यापकांना केल्या आहेत.
ही मागणी मान्य झाल्याबद्दल पंचायत समिती विभागाचे तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार, दीपक चामे, सुरेश सुडे, संजय बिरादार, अमोल राठोडे, प्रदीप ढेंकरे, गोविंद जगताप, चंद्रकांत तोळमारे, काकासाहेब ठोके, मोहन सावंत, राजासाहेब मुल्ला, दयानंद वायदंडे, दत्तूसिंग ठाकूर, धनराज भोसले, बालाजी सोनटक्के, बी.के. पाटील, डी.झेड. गायकवाड, सत्यनारायण वडे यांच्यासह पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.
शिक्षकांच्या प्रश्नाबाबत कटिबद्ध...
तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील. सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे शिक्षक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी सांगितले.