आरक्षणासाठी धनगर समाजाचा औसा तहसील कार्यालयावर मोर्चा
By हरी मोकाशे | Updated: December 29, 2023 17:51 IST2023-12-29T17:51:18+5:302023-12-29T17:51:48+5:30
सकल मराठा समाज औसा व वीरशैव समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

आरक्षणासाठी धनगर समाजाचा औसा तहसील कार्यालयावर मोर्चा
औसा : धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी दुपारी येथील किल्ला मैदानावरून धनगरी ढोल- ताशा पथकासह सकल धनगर समाजाच्या वतीने मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
धनगर समाजाला एस.टी.चे आरक्षण देण्यात यावे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना चालू करावी, समाजाला एक हजार कोटी रुपयांच्या विविध योजना चालू कराव्यात, मेंढपाळ बांधवांवरील हल्ले थांबवण्यात यावेत आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दत्ता कांबळे यांना देण्यात आले.
या मोर्चात गणेश हाके, घनश्याम हाके, देविदास काळे, डॉ. स्नेहा सोनकाटे, राजेश सलगर, राम कांबळे, हनुमंत कांबळे, उद्धव काळे, सुधाकर लोकरे, नितीन बंडगर तसेच ज्योती भाकरे, प्रमिला कांबळे, शशिकला दुधभाते, सुमन कांबळे, गोदावरी कांबळे, ज्ञानेश्वरी कांबळे आदी महिलांचा मोठा सहभाग होता. समाजाच्या विद्यार्थिनीच्या हस्ते मागण्यांचे निवेदन नायबत तहसीलदार दत्ता कांबळे यांना देण्यात आले. सकल मराठा समाज औसा व वीरशैव समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.