धनश्री तळेकर हिचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:30+5:302021-09-10T04:26:30+5:30

अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये होत्या. यावेळी संस्था सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते धनश्रीचे शाल, ...

Dhanashree Talekar's success in the state level competition | धनश्री तळेकर हिचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

धनश्री तळेकर हिचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये होत्या. यावेळी संस्था सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते धनश्रीचे शाल, पुष्पहार देऊन कौतुक करण्यात आले. प्राचार्य केंद्रे म्हणाले, आजच्या तरुण व तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा आहे. आपले ध्येय समोर ठेवून ते साध्य करण्यासाठी या ऊर्जेचा वापर व्हावा. कसलीही अडचण आली तरी खचून न जाता त्या अडचणीवर मात करावी, मानसिक ताण - तणाव न घेता मन शांत ठेवावे. चांगला आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा. यावेळी मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, आदी उपस्थित होते. यशाबद्दल पालकमंत्री अमित देशमुख, आ. विक्रम काळे, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, डॉ. वंदना ओहळ, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, बोर्डाचे सुधाकर तेलंग, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, राणी केंद्रे, करिश्मा केंद्रे, मुख्याध्यापक आर. पी. मुंडे, विजयकुमार लोहारे, वर्षा स्वामी, शिवकुमार चिकले, आदींनी कौतुक केले.

Web Title: Dhanashree Talekar's success in the state level competition