शिवाचार्य महाराजांच्या समाधीचे भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:18+5:302021-09-03T04:21:18+5:30

सकाळी संजीवन समाधी महाअभिषेक झाला. त्यानंतर वसमत येथील थोरले मठ संस्थानचे श्री.ष.ब्र. १०८ वेदांताचार्य डिगांबर शिवाचार्य महाराज यांचे प्रसादाचे ...

Devotees visit Shivacharya Maharaj's Samadhi | शिवाचार्य महाराजांच्या समाधीचे भाविकांनी घेतले दर्शन

शिवाचार्य महाराजांच्या समाधीचे भाविकांनी घेतले दर्शन

सकाळी संजीवन समाधी महाअभिषेक झाला. त्यानंतर वसमत येथील थोरले मठ संस्थानचे श्री.ष.ब्र. १०८ वेदांताचार्य डिगांबर शिवाचार्य महाराज यांचे प्रसादाचे कीर्तन झाले. त्यानंतर बेटमोगरा येथील सिद्धदयाळ शिवाचार्य, मुखेड येथील डाॅ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, वसमत येथील दिगांबर शिवाचार्य महाराज, पाथरी येथील काशीनाथ शिवाचार्य महाराज, कळमनुरी येथील महादेव शिवाचार्य महाराज, टाकळी येथील शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत धर्मसभा झाली.

यावेळी औरंगाबाद येथील जान्हवी देशमाने यांनी तांडवनृत्य तर शंखनाद कुरूंदा येथील विश्वनाथ स्वामी यांनी केले. कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, सांबअप्पा महाजन, गणेश हाके, दिलीपराव देशमुख, भक्तिस्थळचे रामदास पाटील, माधवराव बरगे, शंकरराव मोरगे, शिवानंद हैबतपुरे, बबनराव हैबतपुरे,

नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे,

संदीप डाकुलगे, शीला मालवदे, स्वाती देशमाने, ॲड. हेमंत पाटील, भारत सांगवीकर, विकास महाजन, डाॅ. अजित गोपछडे, शिवाण्णा नरंगले, अविनाश भोसीकर, वसंत शेटकर, सुशील घोटे, महावीर बिदराळे, विजय सिद्धेवार, सुभाष शेटकर, नगरसेवक रवी महाजन, नगरसेवक संदीप चौधरी यांची उपस्थिती होती.

कॅप्शन : अहमदपूर येथील भक्तिस्थळावर बुधवारी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी माजी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माधवराव बरगे, शंकरराव मोरगे, सांब महाजन.

Web Title: Devotees visit Shivacharya Maharaj's Samadhi