देवणी तहसील कार्यालय झाले चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:58+5:302021-02-08T04:17:58+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात सुंदर माझे कार्यालय अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होत तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या ...

देवणी तहसील कार्यालय झाले चकाचक
जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात सुंदर माझे कार्यालय अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होत तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या पुढाकारातून हे अभियान राबविले जात आहे. या उपक्रमात कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे कार्यालयातील प्रत्येक कक्ष चकाचक झाला आहे. त्याचबरोबर, तहसील कार्यालयाच्या परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. दरराेज कार्यालयातील स्वच्छतेचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली जात असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय कार्यालयांबरोबर खासगी कार्यालयांनीही हा उपक्रम राबवावा, असे आवाहन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी करून शासकीय कार्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे या मोहिमेत सर्वांनी सहभाग नोंदवावा, असेही ते म्हणाले.
थुंकणाऱ्यास दंड...
जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास, तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्यास मनाई केली आहे. त्यामुळे तहसील कार्यालय इमारत व परिसरात तंबाखू अथवा सुपारी खाऊन थुंकल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधितांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येईल, असे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी सांगितले.