जळकोटच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:53+5:302021-07-12T04:13:53+5:30
येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित काेविड योद्ध्यांचा सत्कार, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व वृक्षारोपण समारंभात ते बोलत ...

जळकोटच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कटिबद्ध
येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित काेविड योद्ध्यांचा सत्कार, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व वृक्षारोपण समारंभात ते बोलत हाेते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. सुळ, डॉ. भारती, डॉ. चंद्रकांत काळे, डॉ. शीतल काळे, डॉ. दाताळ, माजी सभापती मन्मथप्पा किडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबिडे, प्रशांत देवशेट्टे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, खाटिक महासंघाचे अध्यक्ष खादरभाई लाटवाले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी, स्वाती केंद्रे, डुकरे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, बाबूराव जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, संगायोचे अध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, सत्यवान पाटील दळवे, गजानन दळवे, उपअभियंता संजय गर्जे, कॉ. राजू पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, दस्तगीर शेख, गोविंद भ्रमण्णा, भाजप तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, सरपंच शिरीष चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माने, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पवार, शिवा काळे, राजेंद्र धुळशेट्टे, कैलास पाटील, अजीजभाई मोमीन, अमोल कळसे यांनी राज्यमंत्री बनसोडे यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन अतिक मोमीन यांनी केले, तर आभार विवेक पोतदार यांनी मानले.
पत्रकार हा समाजाचा आरसा...
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, पत्रकार हा समाजाचा आरसा असून तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. भविष्यात पत्रकारांनी मार्गदर्शक म्हणून कार्य करावे. समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सातत्याने मांडून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.