उपसरपंच पाटील, पटणे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST2021-02-08T04:18:04+5:302021-02-08T04:18:04+5:30
... आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा बेलकुंड : काेरोना संकटाच्या काळात मोलाची भूमिका बजावलेल्या तुंगी बु. येथील आरोग्य कर्मचारी, आशा ...

उपसरपंच पाटील, पटणे यांचा सत्कार
...
आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा
बेलकुंड : काेरोना संकटाच्या काळात मोलाची भूमिका बजावलेल्या तुंगी बु. येथील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शिक्षक, ग्रामसेवक, सेवक, ॲन्टी कोरोना फोर्स यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हा परिषद सदस्या संगीता माने यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी राजेंद्र माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमजद पठाण, ग्रामसेवक कार्तिक क्षीरसागर, प्रशासक शेख, डॉ. बनकर, बी. जी. चौधरी, मोहन कावळे, बाजीराव जाधव, शिवराज सूर्यवंशी, श्रीहरी सूर्यवंशी, संतोष जाधव आदी उपस्थित होते.
...
निलंगा येथे दिव्यांगांना साहित्य वाटप
निलंगा : तालुक्यातील अंबुलगा बु., हणमंतवाडी, आनंदवाडी, बोरसुरी, चिंचोली स. येथील नोंदणी केलेल्या दिव्यांगांना जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांच्या हस्ते स्कुटर, मोबाईल, श्रवणयंत्र, काठी, सायकली, व्हिलचेअर आदी साहित्याचे वाटप केले. यावेळी चेअरमन दगडू सोळुंके, पं.स. सदस्य वामनराव भालके, श्रीमंत जाधव, सरपंच सुभाष शिंदे, संदीप पाटील, आशिष पाटील, भानुदास होरे, गुंडेराव बिरादार, ग्रामसेवक वैजनाथ चात्रे आदी उपस्थित होते.
...